मूल जन्माला आले कि त्याची ग्रहस्थिती सांगते कि त्याला कोणते दोष आहेत. जन्मासोबत मसाला अनेक प्रकारचे दोष येऊ शकतात. जसे कि काल सर्प दोष, सती, विधवा दोष, पितृ दोष इत्यादी. असे अनेक प्रकारचे दोष माणसाचा आयुष्यात अनेक प्रकारचा समस्या निर्माण करत असतात. व्यक्तीचा कुंडलीतील दोष दूर करण्यासाठी हिंदू अध्यात्मात अनेक प्रकारचे उपाय सांगितले आहे. विवाहाशी संबंधित समस्यांपैकी एक दोष म्हणजे विधवा दोष याला वैधव्य योग असेही म्हणतात.
त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग हे मंदिर विविध पूजनासाठी खूप प्रसिद्ध मंदिर आहे. त्र्यंबकेश्वर येथे केल्या जाणाऱ्या पूजांपैकी एक महत्वाची पूजा म्हणजे कुंभ विवाह विधी.
कुंडलीत विधवा योग असणाऱ्या मुलींचा विधवा योग मिटवण्यासाठी त्र्यंबकेश्वर मध्ये कुंभ विवाह केला जातो. विधवा योग हा जन्मा सोबतच मुलींचा कुंडलीत येत असतो. विधवा योग म्हणजे लग्न झाल्यानंतर त्या मुलीचा वराला कसलाही त्रास होऊ शकतो, त्याचा लवकर मृत्यू होऊ शकतो आणि मुलीला संपूर्ण आयुष्य त्या वराची विधवा म्हणून काडावे लागू शकते.
त्यामुळे विधवा योग असणाऱ्या मुलीला तिचा लग्ना आधी कुंभ विवाह करावा लागतो. कुंभ विवाह विधी मध्ये मुलीचे लग्न एका मटक्यात ठेवलेल्या विष्णू देवाचा मूर्तीसंग लावले जाते. जसे पारंपारिक विवाह विधी असतात त्या नुसारच हा विवाह सोहळा पार पडतो. त्यात मुलीचे कन्यादान हि केले जाते. कुंभ विवाह विधीत मुलीचा मामा, आई, वडील आणि भाऊ असणे आवश्यक असते. विष्णू देवाशी विवाह लावल्या नंतर मुलीचे सर्व दोष मिटले जातात आणि मुलगी तिचा मनपसंत वराशी लग्न करू शकते. कुंभ विवाह विधी पूर्ण झाल्यानंतर विष्णू देवाची मूर्ती पाण्यात विसर्जित केली जाते.
त्र्यंबकेश्वर मध्ये कुंभ विवाह करण्याची पद्धती :
त्र्यंबकेश्वर मध्ये कुंभ विवाह करताना लक्षात घेण्याची सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे त्र्यंबकेश्वर मधील पंडित. त्र्यंबकेश्वर मध्ये फक्त ताम्रपत्रधारी पंडितच कोणतीही पूजा करू शकतात. ताम्रपत्रधारी पंडित हे त्र्यंबकेश्वर चे अधिकृत आणि अस्सल पंडित आहेत. त्यांचा हाताने पूजा करून घेतल्यावर तुम्हाला पूजेचा सर्वात अध्यात्मिक अनुभव मिळतो. विधी साठी येण्या पूर्वी तुम्ही https://www.trimbakeshwar.org/ या ऑफिसिअल वेबसाइट वरून ताम्रपत्रधारी पंडितांशी संपर्क साधावा आणि योग्य तो मुहूर्तावर तुमची पूजा बुक करून घ्यावी. विधी मध्ये मुलगी, तिचे आई वडील , मामा आणि भाऊ उपस्तित असणे आवश्यक आहे. ताम्रपत्रधारी पंडित तुम्हाला पूजेचे साहित्य पुरवतील. पंडित जी सांगतील त्या नुसार कपडे परिधान करावे, स्वस्तिवाचनाद्वारे पूजेसाठी संकल्प केला जातो, गणपतीची पूजा केली जाते, मातीचा भांड्यावर (कुंभावर) विष्णू ची मूर्ती ठेऊन पुजली जाते. आणि पूजा संपन्न झाल्यानंतर विष्णू ची मूर्ती पाण्यात विसर्जित केली जाते आणि ताम्रपत्रधारी पंडितांचा आशीर्वाद घेऊन पूजा पूर्ण होते.
मंगल दोष आणि त्यावरील उपाय :
मंगल दोष हा देखील विवाहात समस्या निर्माण करणाऱ्या दोषांपैकी एक आहे. मंगल दोष असणाऱ्या व्यक्तीला उशिरा लग्न होणे, लग्न नंतर भांडणे इत्यादी समस्यांचा सामना करावा लागतो. मंगल दोष हा त्या व्यक्तीचा सभोवताली असणाऱ्या लोकांचा आयुष्यावर हि परिणाम करत असतो. मंगल दोष निवारणासाठी त्र्यंबकेश्वर येथे भात पूजा केली जाते.
व्यक्तीचा जन्मावेळी त्याची जन्मवेळ आणि तारीख नोंदवली जाते आणि त्यावरून त्याची कुंडली काढली जाते. जर जन्म वेळी त्याचा कुंडलीत १, ४, ७, ८, १२ या पैकी कोणत्याही घरात मंगल दिसत असेल तर तेव्हा त्या व्यक्तीला मंगल दोष असतो. प्रत्येक वेळी मंगल दोष अशुभ नसतो. मंगल दोषाचे अंशिक मंगल, सौम्य मंगल, धुमावदार मंगल आणि तिवर मंगल असे चार प्रकार पडतात. कुंडलीतील सातवे घर हे विवाहाशी, जोडीदाराशी संबंधित असते. मंगला ७ व्या घरातील प्रभाव हा विवाहात अडचणी निर्माण करत असतो आणि तो वैवाहिक जीवनासाठी वाईट असतो. मंगलदोषाची सविस्तर माहिती मुहूर्त चिंतामणी, ज्योतिर् महार्णव, मुहूर्त गणपती या ग्रंथांत आढळते. भट पूजा हा मंगल दोष निवारणासाठीचा उपाय आहे. पूजे साठी त्र्यंबकेश्वर चा ताम्रपत्रधारी पंडित शी संपर्क साधावा.
Comments