महाशिवरात्री या विशेष दिवसामागे अनेक कथा आणि विश्वास आहे. वेग वेगळ्या पुराणांमध्ये महाशिवरात्री बद्दल अनेक कथा सांगितल्या जातात.
भागवत पुराणातील कथा :
जेव्हा देव आणि असुर यांमध्ये समुद्र मंथन चालू होते तेव्हा त्या समुद्र मंथनातून अनेक मौल्यवान वस्तूंसोबत विषाने भरलेला हंडा बाहेर आला होता आणि कोणीही तो स्वीकारण्यास तयार नव्हता. त्या हंड्यातील विष सर्व विश्वात पसरू लागले होते. अनेक प्राणी , माणसे त्या विषामुळे मरू लागली होती . सर्व देवी देवता महादेवाला शरण जाऊन त्यांना काहीतरी उपाय कड्यास विनंती करत होते. तेव्हा महादेवांनी ते सर्व विष पिऊन आपल्या कंठात धरून ठेवले आणि सर्व लोकांचा जीव वाचवला. त्यामुळे महादेवांना नीलकंठ या नावाने हि ओळखले जाते. त्या रात्री शिवजींचा हा चमत्कार पाहून सर्व देवी देवता रात्रभर जागून त्यांची प्रशंसा करू लागले. तेव्हा पासून सर्व देवी देवता त्यांना "देवो के देव महादेव" म्हणू लागले. तेव्हा पासून हि रात्र महाशिवरात्री म्हणून रात्रभर जागरण करून साजरा केला जातो.
लिंग पुराणातील कथा :
लिंग पुराणात सांगितल्या नुसार महाशिवरात्री हा दिवस महादेवाचा जन्म दिवस असतो. या दिवशी महादेव ज्योतिर्लिंगाच्या स्वरूपात पहिल्यांदा प्रकट झाले होते.
एकदा विष्णू आणि ब्रह्मादेव यांचा मी सर्वश्रेष्ठ या वरून वाद चालू होता. त्यांचा वादामुळे सर्वत्र अशांतता पसरू लागली. त्यांच्यातील वाद शांत करण्यासाठी महादेवानी ज्योतिर्लिंगाचा अवतार घेतला. ते ज्योतिर्लिंग एक समाप्त न होणाऱ्या अग्नीप्रमाणे दिसत होते. विष्णू देव आणि ब्रह्मा देव याना महादेवाचे ते अद्भुत रूप पाहून विश्वास बसेना आणि ते महादेवाला शरण गेले. म्हणून महाशिवरात्रीचा हा दिवस महादेवाचा जन्म दिन म्हणून हि साजरा करतात.
तिसरी कथा हि महादेव आणि देवी पार्वती यांचा विवाहशी संबंधित आहे :
महाशिवरात्री चा दिवशी देवी पार्वती आणि महादेव या दोघांची हि पूजा केली जाते. हा दिवस त्यांचा विवाह तिथी दिवस म्हणून हि साजरा केला जातो. ह्या दिवशी महादेव आणि देवी पार्वतीने त्रियोगी मंदाकिनी येथे विवाह केला होता. त्रेता युगापासून पासून त्यांनी सात फेरे घेतलेली आग आजही तेथे पेटलेली दिसते. असे म्हणतात या ठिकाणी जो कोणी विवाह करेल त्याचा आयुष्यात सुख येते.
या सर्व गोष्टींमुळे महाशिवरात्री हा दिवस मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. या दिवशी महादेवाला दुधाने अभिषेक घालून परिवारासाठी सुख, समाधान याची मागणी केली जाते.
नाशिक मधील त्र्यंबकेश्वर येथे साजरा केला जाणारा महाशिवरात्री हा सण :-
महाशिवरात्री सण साजरा करण्या मागे फक्त वरील कथाच कारण नाहीतर काही वैज्ञानिक कारण देखील आहेत. महाशिवरात्री चा दिवशी अनेक नैसर्गिक चड उत्तर अनुभवायला मिळतात. त्या दिवशी ऊर्जा हि वाढत असते. त्या रात्री जागरण करण्याचा सल्ला दिला जातो त्र्यंबकेश्वर मध्ये या रात्री मोठी जत्रा भरते. या रात्री तुम्ही झोपलात म्हणजे तुम्ही त्या ऊर्जांना तुमचा मध्ये सामावून घेण्यास रोखत आहात. अनेक लोक या रात्री त्र्यंबकेश्वर मध्ये पाठीचा कणा ताठ ठेऊन ध्यान करत असतात. या दिवशी तुमच्यातील गुणांची वाढ होत असते. त्यामुळे दान धर्म, ध्यान इत्यादी चांगले कर्म करण्यावर लक्ष द्यावे. जर तुम्ही खराब कामे केली तर तुमच्यातील ते गुण वाढतील.
त्र्यंबकेश्वर हे महादेवाचे एक अद्भुत मंदिर आहे. महाशिवरात्रीला येथे मोठी जत्रा असते. लोक रात्र भर जागरण करून ध्यान धारणा करतात. महाशिवरात्रीला त्र्यंबकेश्वर चा ज्योतिर्लिंगावर केलेले रुद्राभिषेक खूप पवित्र मानले जाते.
महाशिवरात्रीचा उपवासाचे महत्व :
१) महाशिवरात्री चा उपवास स्त्रियांसाठी लाभदायक मानला जातो
२) चांगला पती मिळावा यासाठी अविवाहित स्त्रिया हा उपवास करतात
३) लग्न झालेल्या महिला नवऱ्याचा सुरक्षेसाठी, त्याचा लांब जीवनासाठी हा उपवास करतात.
४) लग्नानंतर जर कोणाला मूल होण्यास समस्या येत असतील तर त्याने देखील महाशिवरात्रीचा उपवास करावा.
Comments