पितृ या शब्दाचा अर्थ होतो आपले पूर्वज. आणि पितृ दोष म्हणजे आपल्या पूर्वजांनी त्यांचा मरणा आधी केलेले वाईट कर्म. जर आपल्या मरण पावलेल्या पूर्वजांनी जिवंत असताना वाईट कर्म केलेले असेल तेव्हा पुढील पिढीला पितृ दोष असण्याची शक्यता असते. म्हणजेच पितृ दोष हा भूतकाळात आपल्या पूर्वजांनी केलेले वाईट कर्मांचे फळ असते.
पितृ दोष होण्याची तीन कारणे असू शकतात :
१) व्यक्तीचा कुंडलीतील चुकीचा ग्रहस्थितीमुळे पितृ दोष होऊ शकतो.
२) आपल्या पूर्वजांनी केलेल्या वाईट कर्मांमुळे पितृ दोष होऊ शकतो.
३) किंवा व्यक्तीचा स्वतः चा वाईट कर्मांमुळे पितृ दोष होऊ शकतो.
पितृ दोष, पितृ पूजा, पितृ पक्ष हि हिंदू धर्मात पाळली जाणारी एक फार महत्वाची संकल्पना आहे. पितृ दोष कुंडली मध्ये अल्यास त्या व्यक्तीला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. पितृ दोष असणाऱ्या व्यक्ती ला सतत अपयश येते दुःखी जीवन, आर्थिक हानी, वैवहिकी अडचणी, शुभ कार्यात अडचणी इत्यादी अडचणी त्या व्यक्तीला येतात.
पितृ दोष निवारणाचे काही उपाय :
पितृ दोष निवारणासाठी त्र्यंबकेश्वर देवस्थान येथे केली जाणारी त्रिपिंडी श्राद्ध पूजा फार लाभदायक ठरते.
त्रिपिंडी श्राद्ध पूजा पूर्वजांनी केलेले सर्व वाईट कृत्य नष्ट होण्यास मदत होते.
पितृ दोष निवारण साठी ब्राह्मणांना भोजन ,वस्त्र दान करावे.
वटवृक्षाला नियमित पाणी अर्पण करावे.
जनावरांना अन्न खाऊ घालणे.
गरजू लोकांना मदत करणे.
उगवत्या सूर्याला तीळ मिश्रित पाणी अर्पण करणे.
इत्यादी गोष्टी तुमहाला पितृ दोष निवारण साठी मदत करतील.
पितृ दोष निवारण पूजा :
पितृ दोष निवारण पूजा त्र्यंबकेश्वर येथे गोदावरी नदीचा काठी केली जाते . या पूजेसाठी ३ दिवसांचा कालावधी लागतो.
या विधी मध्ये पिंड दान विधी केला जातो.
पूजेचा एक दिवस आधी त्र्यंबकेश्वर मध्ये हजर राहावे लागते. पूजा चालू झाल्यानंतर व्यक्ती त्र्यंबकेश्वर देवस्थान सोडून कोठे जाऊ शकत नाही.
शुद्ध तुपाचा दिवा लावून सर्व पितरांना तृप्त करण्याची शपथ घेतली जाते.
रोज या मंत्राचे १६ माळ पाठ करा किंवा चार दिवस ४ माळ पाठ देखील करू शकता.
पूजेचा दिवशी पांढरे कपडे घालावे.
पूजे दरम्यान सात्विक भोजन च ग्रहण करावे.
गरीब लोकांना अन्न दान करावे.
पूजे पासून पुढील ४१ दिवस मांसाहार आणि कोणतेही व्यसन करू नये.
पितृ दोष निवारण पूजे दरम्यान कोणत्या गोष्टी पाळल्या पाहिजेत :
दर वर्षी पितरांचा मृत्यू चा तिथीला श्राद्ध विधी केले पाहिजे.
श्राद्ध तिथीला पितरांना जल अर्पण केले पाहिजे.
गरजू लोकांना अन्न, वस्त्रे दान केली पाहिजे.
पूर्वजांचे नाव घेऊन त्यांचे स्मरण करावे.
पितृ दोष निवारण मंत्राचा जप करावा.
पितृ दोष निवारण पूजेसाठी येणारा खर्च :
पूजेत वापरल्या गेलेल्या सामग्रीवर पूजेचा खर्च ठरतो.
पितृ दोष पूजा हि तीन दिवसांची असते ज्यात फार थोडा खर्च करावा लागतो . त्र्यंबकेश्वरचे ताम्रपत्रधारी पंडित तुमहाला पूजेची सामग्री सांगतील आणि तुमचा राहण्याची, जेवणाची सोया हि करतील. पूजेची सामग्री पंडित जी उपलब्ध करून देतील.
त्र्यंबकेश्वर हे महादेवाचे जिवंत ज्योतिर्लिंग मानले जाते. त्र्यंबकेश्वर चे ज्योतिर्लिंग ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तीन देवतानाचे प्रतीक आहे. या भूमी वर केली जाणारी पूजा लवकर फळ देणारी आणि लाभदायक च ठरते . त्र्यंबकेश्वर मधील ताम्रपत्रधारी ब्राह्मणांना पुरोहित असे संबोधले जाते. हे पंडित येथील अस्सल, ज्ञानी पंडित आहेत. तेच तुंहाला पूजेसाठी योग्य मदत करू शकता. त्र्यंबकेश्वर येथे वाहणाऱ्या पवित्र गोदावरी नदी मुळे हे ठिकाण पितृ दोष निवारण साठी सर्वोत्तम ठिकाण मानले जाते. पितृ पक्ष हा पितृ दोष निवारण साठी सर्वात मोठा मुहूर्त असतो.
Komentáře